Monday, September 7, 2009

एक आगळे -वेगळे व्यक्तिमत्त्व

ह्या आजच्या जगात , एखादा माणूस इतक्या स्वच्छ मनाचा असू शकतो ह्या वर कोणाचा ही विश्वास बसणार नाही. प्रामाणिकता जणू ह्याच्या चेहऱ्यावरूनच जाणवते . एखादा संत जन्मला म्हण्नेय काही चुकीचे ठरणार नाही.कोनाच्या अधे -मध्ये कधीच नसलेला , आपल्या ठराविक मित्रानमध्ये खूप रमायचा . मित्रमंडळी फार नसली तरी आहेत ती जिवापार जपणे ह्यातच त्याला आनंद होतो. मित्रान बरोबर गप्पा मारतांना सुद्धा आपले विचार तो शांत पणे मांडत असे. अनोळखी लोकांशी ओळ्ख करणे हे त्याला फारसे अवघढ नसे . कुठे ही असला तरी तो आजू बाजूच्या लोकांशी जमेल ती माहिती मिळवत असे. त्यामुळेत्याच्या कडे कधीही काही विचारल्यास उत्तर मिळणे हे गृहीतच धरले जायचे .पुस्तक वाचणे हा त्याचा छंद असला तरी वेळ वाया न घालवण्याचे एक साधन पण होते. एखादा विषय मांडला असता, तो कुठल्या ही लेखकाचे संदर्भ देऊन त्यात काय म्हटले आहे , हे सांगण्यात प्रथम असे. गाणी आणि सिनेमात सुद्धात्याला तेवढाच रस आहे. ते फक्त मनोरंजनाचे साधन नसून त्यातल्या बारिकी सुद्धा तो जाणतो . गर्दीत जाणे तो शक्यतो टाळतो . जरी लोक ओळखीची असली तरी पार्ट्या आणि ट्रिप्स पासून तोलांबच राहतो .ठराविक काही लोकां बरोबरच तो पूर्ण पणे दिल -खुलास वावरत असे. time management काय असते त्याच्या कडून शिकण्या सारखे आहे. एखादा प्लान आधी ठरला असल्यासतो ते पूर्ण करणारच ह्याची खात्री आम्हाला आहे. अनेक वेळा असे होते की आपण काही तरी ठरवतो आणिमग ते विसरून जातो . पण ह्याच्या कड्ण ते कधीच चुकणार नाही, हे महत्त्वाचे .कुठली गोष्ठ कधीआणि कशी करावी हे त्याला चांगलेच माहित असून, ती करून पार पाडण्यात जी महिनत आणि जो अप्प्रोच असावा हे तर त्याच्या शिवाय कोणाला जमणे हे कौतुकाची बात आहे. अंधविश्वास नसला तरी देवा -धर्म वर त्याची पूर्ण श्रद्धा आणि विश्वास आहे. नियमित देवाचे स्तोत्र म्हणणे, वाचन आणि ध्यान ह्यावर्ण त्याचे devotion समजून येते. तोंडातून कधी हीअपशब्द बाहेर पडत नसल्याने कधीच तो कुठल्याही वादाला कारणीभूत होत नसे.एखाद्याला गुरु मानले तर पूर्ण पणे त्याचा आदर करणे व न चुकता त्यांच्या विचारांचे पालन करणे हे तो कधीच विसरत नसे. एखाद्या नवीन जागेस जायचे असल्यास आपल्याला नेहमी तिकडे कसे पोचावे असे प्रश्न पडतअसतात .पण त्याला ते सगळे माहित असते, जणू हा आधी तिकडे जाऊनच आला आहे .सकाळी रोज नियमित वेळीउठणे , व्यायाम करणे - ते सुद्धा न चुकता हे महत्वाचे . ह्या गृहस्ता बद्दल जेवढे लिहू तेवढे कमीच . असा मनुष्य ह्या जगात मिळणे जवळ - जवळअशक्यच आहे. माझे भाग्य म्हणून त्याची सोबत मला लाभली आणि बरेच काही शिकायला मिळाले .त्याच्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण हा अवस्मरणीय आहे आणि असा मित्र मला मिळाला ह्याचा मला अभिमान आहे.